किवीच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे होतात. किवीमध्ये असणारे पोषक घटक रक्तातील ऑक्सिजन, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्ही डाळिंबाचे दाणे किंवा त्याचा रस करुन देखील पिऊ शकता.
हिरव्या भाज्या लोह आणि व्हिटॅमिन सीचे सर्वोत्तम स्रोत आहेत. पालकमध्ये अ, बी 9 आणि ई जीवनसत्त्वे देखील असतात.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.संत्री खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
ब्रोकोली केवळ पौष्टिक नाही तर वैद्यकीय फायद्याची सुद्धा आहे. यातून भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
अक्रोड हे मेंदूला आवश्यक असलेल्या 'व्हिटॅमिन ई' चा उत्तम स्रोत आहे.मेंदुच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अक्रोड उपयोगी आहे.
बदाममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.बदाम खाल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी, खोकला, सर्दी, ताप आणि हार्ट बर्न इत्यादींसाठीही लिंबू फायदेशीर आहे.
उच्च रक्तदाब असेल तर द्राक्षाचा आहारात समावेश करा. यात सोडियमचे प्रमाण कमी असते, ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.
बीट रसात लोह मोठ्या प्रमाणात असते. बीटचा रस पिऊन शरीरात लोहाचा अभाव रोखता येतो. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ते प्याल तर फायदा होईल.