अखेर पाहायला मिळाला इरफान पठाणच्या पत्नीचा चेहरा

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक इरफान पठाणने लग्नाच्या 8 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना पत्नीचा चेहरा दाखवला आहे.

इरफान पठाणचे 2016 मध्ये लग्न झाले होते. त्याने याआधीही अनेकवेळा आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण चाहत्यांना पत्नीचा चेहरा कधीच पाहायला मिळाला नाही.

कधी ती बुरख्यात तर कधी तोंडावर हात ठेवून दिसत होती. मात्र यावेळी चाहत्यांना तिचे सौंदर्य पाहायला मिळाले. त्यामुळे आता एखाद्या अप्सरेलाही लाजवेल असे इरफानच्या पत्नीचे सौदर्य असल्याचे चाहते म्हणत आहेत.

इरफान पठाणच्या पत्नीचे नाव सफा बेग असून त्यांना दोन मुले आहेत. लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त इरफान पठाणने पत्नी सफा बेगसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

एकाच व्यक्तीसोबत इतक्या भूमिका साकारण्याची कला पार पाडलेली ही व्यक्ती. मूड चांगला करणारी, विनोदी, त्रास देणारी, प्रत्येकवेळी साथ देणारी, माझ्या मुलांची आई. माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट प्रवासात माझी पत्नी म्हणून तू आहेस.

इरफान पठाणच्या या पोस्टवर, त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबतच चाहते सफा बेगच्या सौंदर्याचे कौतुकही करत आहेत. पठाणच्या पत्नीच्या सौंदर्याने चाहते वेडे झाले आहेत.

सफा बेग ही व्यवसायाने मॉडेल होती, मात्र इरफान पठाणसोबत लग्न केल्यानंतर तिने मॉडेलिंग सोडले. इरफानने 2016 मध्ये सफाशी लग्न केले.

VIEW ALL

Read Next Story