जुही चावलाने सांगितलं पतीचं सिक्रेट्स, 'लग्नाआधी रोज....'

जुही चावला लवकरच 'झलक दिखला जा 11' या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे.

शोच्या प्रोमोमध्ये जुहीला तिच्या आयुष्यातील जुने सुंदर क्षण आठवले.

सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शोचा हा नवीन प्रोमो रिलीज केला आहे.

कॅप्शन लिहिले - अद्रिजा आणि आकाशने त्यांची गोष्ट कागद आणि पेनच्या रूपात सांगितली. त्यातून प्रभावित होऊन जुहीने शेअर केले एक मजेदार गुपित!

जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले.

जय हे जुहीच्या तुलनेत दिसायला वयस्कर दिसतात, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत असतात.

या दोघांच्या वयात 6 वर्षांचे अंतर असल्याचे सांगण्यात येते.

लग्नापूर्वी जय मला रोज पत्रे लिहायचा, असे सिक्रेट जुहीने सांगितले.

जुही चावला गेल्या वर्षी 'फ्रायडे नाईट प्लॅन' या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती.

या चित्रपटात इरफान खानचा मुलगा बाबिल खानही तिच्यासोबत होता.

VIEW ALL

Read Next Story