भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यानच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये यजमान संघाने भारतीय संघाला आणि चाहत्यांना धक्का दिला. एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. जाणून घ्या यासंदर्भात...

दोन्ही सामन्यांमध्ये भारताला अपयश

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 150 धावांचं लक्ष गाठता आलं नव्हतं आणि दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 153 धावांचा पाठलाग करणाऱ्या यजमान संघाला रोखता आलं नाही.

प्रथम फलंदाजीचा निर्णय

गुयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

गोलंदाजांची धुलाई

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने एकट्यानेच पाहुण्या संघातील गोलंदाजांची धुलाई केली. याच जोरावर वेस्ट इंडिजने भारताला पराभूत केलं.

2-0 ने आघाडी

वेस्ट इंडीजच्या संघाने भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 सामन्यामध्ये 2-0 ने आघाडी मिळवली आहे.

भारतासाठी वाईट वेस्ट इंडीजसाठी उत्तम

भारताच्या या पराभवामुळे आता एक नकोसा विक्रम भारतीय संघाच्या नावे नोंदवला गेला आहे. तर दुसरीकडे ही कामगिरी वेस्ट इंडीजसाठी मात्र अभिमानास्पद आहे.

पहिल्यांदाच सुरुवातीचे सलग 2 सामने जिंकले

वेस्ट इंडीजने भारतावर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत कोणत्याही टी-20 मालिकेमध्ये पहिल्यांदाच सुरुवातीचे सलग 2 सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला आहे.

2011 नंतर पहिल्यांदाच...

तसेच 2011 नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीजच्या संघाने भारतीय संघाला कोणत्याही फॉरमॅटमधील क्रिकेट सामन्यांमध्ये सलग 2 वेळा पराभूत केलं आहे.

त्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

याहून लज्जास्पद म्हणजे वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक सामन्यांमध्ये पराभूत होणारा आशियामधील संघ म्हणून भारताने नकोश्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.

भारताला वेस्ट इंडीजने किती वेळा केलं पराभूत?

भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या 9 सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पाहिलं आहे. भारताबरोबरच बांगलादेशलाही वेस्ट इंडीजने 9 वेळा हरवलं आहे.

नचक्कीही होईल

त्यामुळे आता उर्वरित सिरीजमधील एक जरी सामना भारताने गमावला तर भारत मालिका गमावेलच पण एका नकोश्या विक्रमामुळे त्याची नचक्कीही होईल.

बांगलादेशपेक्षाही वाईट कामगिरी

पण वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक वेळा पराभूत होणारा देश म्हणून बांगलादेशपेक्षाही वाईट कामगिरी करत नकोसा विक्रमही भारत स्वत:च्या नावावर करुन घेईल.

VIEW ALL

Read Next Story