FASTag

एकदोन नव्हे, 7 मार्गांनी रिचार्ज करता येतो FASTag; कमाल आहे ना?

वाहनांच्या रांगा

इथं एक असं कमाल तंत्रज्ञान वापरण्यात आलं ज्यामुळं टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा तुलनेनं कमी झाल्या. इलेक्र्टॉनिक पद्धतीनं थेट तुमच्या खात्यातूनच टोलसाठीचे पैसे कापले गेले. हेच फास्टॅग त्यातील पैसे संपल्यावर रिचार्ज कसं करावं हा अनेकांचा भाबडा प्रश्न.

इथं एक असं कमाल तंत्रज्ञान वापरण्यात आलं ज्यामुळं टोलनाक्यांवर लागणाऱ्या रांगा तुलनेनं कमी झाल्या. इलेक्र्टॉनिक पद्धतीनं थेट तुमच्या खात्यातूनच टोलसाठीचे पैसे कापले गेले. हेच फास्टॅग त्यातील पैसे संपल्यावर रिचार्ज कसं करावं हा अनेकांचा भाबडा प्रश्न.

मुख्य मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या कंपनीचा फास्टॅग लावला आहे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून लगेचच यासाठीचं रिचार्ज करू शकता. इथं तुम्हाला ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल अॅपची मदत होईल.

मोबाईल अॅप

फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी मोबाईल अॅपचाही वापर केला जातो. यासाठी तुम्ही मोबाईल वॉलेट अॅप डाऊनलोड करणं अपेक्षित असतं. इथं जाऊन फास्टॅग अकाऊंट लिंक केल्यास रिचार्ज करणं सोपं जातं.

युपीआय

बऱ्याच बँका आणि पेमेंट अॅप युपीआयच्या माध्यमातून फास्टॅग रिचार्जची सुविधा पुरवतात. इथं तुम्ही युपीआय अॅप सुरु करून upi ID नोंदवल्यानंतर हा व्यवहार पूर्ण करु शकता.

NEFT

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफरच्या माध्यमातूनही रिचार्ज करता येतो. तुम्ही बँक खात्यातून एनईएफटीला फास्टॅगसाठी रिचार्ज करू शकता. इथं बेनेफिशियरी अकाउंटवर FASTag नंबर द्यावा लागेल.

POS टर्मिनल

फास्टॅग रिचार्जसाठी तुम्ही जवळच्या POS टर्मिनलला भेट देऊ शकता. फास्टॅग देणाऱ्यांकडूनच टर्मिनल ऑथोराईज्ड केले जातात. इथं FASTag क्रमांक द्या आणि रोख स्वरुपात रिचार्जची रक्कम द्या.

नेट बँकिंग

बरेच नेट बँकिंग पोर्टल तुम्हाला फास्टॅगचा पर्याय देतात. इथं नेट बँकिंगचा पर्याय निवडून तुम्ही रिचार्जचा पर्याय रिलोकेट करु शकता.

टोल प्लाझा

बऱ्याच टोल प्लाझावर फास्टॅग इशुअरकडून काऊंटर सुरु केले जातात. जिथं जाऊन तुम्ही स्वत:हून हा रिचार्ज करू शकता.

VIEW ALL

Read Next Story