भारतातील सर्वात महागडे हॉटेल

भारतातील सर्वात महागडे हॉटेल; एका रुमचं भाडं इतकं की महिन्याभराचा पगारही पुरणार नाही

पंचतारांकित हॉटेल

भारताताल मागील काही वर्षांमध्ये पर्यटनाचा मोठा विकास झाला असून, अनेक परदेशी पर्यटांनी या देशातील विविध भागांना भेट दिली आहे. यावेळी अद्वितीय अनुभव देणाऱ्या पंचतारांकित हॉटेलांना या मंडळींनी पसंती दिली आहे.

ताज महाल पॅलेस

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे असणारं हे एक पंचतारांकित हॉटेल. हे भारतातील पहिलं 5 star हॉटेल म्हणून ओळखलं जातं.

रामबाग पॅलेस

पाहताक्षणी मनात भरणारं हे आहे हॉटेल रामबाग पॅलेस. इथलं एका रात्रीचं किमान भाडं आहे साधारण अडीच लाख रुपये.

उमेद भवन पॅलेस

हे आहे राजस्थानातील जोधपूर येथे असणारं उमेद भवन पॅलेस. इथं पोहोचताच तुम्हाला राजेशाही थाट अनुभवता येतो. ताज हॉटेल्सच्याच अख्त्यारित हे हॉटेल येतं.

ओबेरॉय उदयविलास

उदयपूरमध्ये येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या आवडीचं हॉटेल म्हणजे ओबेरॉय उदयविलास. इथलं सौंदर्य शब्दांच्याही पलिकडलं....

ताज लेक

उदयपूर येथे असणारं जात लेक पॅलेस हॉटेल तुमच्या सुट्टीला अद्वितीय स्तरावर घेऊन जातं. एका आलिशान महालात तुम्हाला राहण्याची संधी मिळते.

कुमारकोम लेक रिसॉर्ट

केरळातील कुमारकोम येथे असणारं हे एक नजर रोखणारं रिसॉर्ट. देशातील महगागड्या हॉटेलांमध्ये हे नावही न चुकता घेतलं जातं.

ओबेरॉय अमरविलास

आग्रा येथे असणारं हॉटेल अमरविलास एका रात्रीसाठी किमान 25 हजार रुपये इतकं भाडं आकारतं.

VIEW ALL

Read Next Story