रोहित शर्मा

वर्ल्ड कप 2023 मध्ये आघाडीवर असणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असणारा खेळाडू आहे रोहित शर्मा. 4 सामन्यांमध्ये रोहितनं 137 च्या स्ट्राईक रेट 265 धावा केल्या.

विराट कोहली

रोहितमागोमाग टीम इंडियातील आणखी एका खेळाडूचं नाव इथं येतं. हा खेळाडू म्हणजे विराट कोहली. 4 सामन्यांमध्ये विराटनं 259 धावा केल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट आहे 90.

विराट

भारतीय संघाच्या वतीनं खेळणाऱ्या विराट कोहलीनं या स्पर्धेत त्याच्या खेळात कमालीचं सातत्य राखलं आहे. त्यामुळं या यादीत तो वरचंच स्थान मिळवत राहण्याची चिन्हं आहेत.

डेवॉन कॉन्वे

न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 4 सामन्यांमध्ये 104 च्या स्ट्राईक रेटनं त्यानं 249 धावा केल्या आहेत.

मोहम्मद रिझवान

मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा खेळाडू यादीत चौथ्या स्थानी असून, त्यानं 3 सामन्यांमध्ये 248 धावा केल्या आहेत.

क्विंटन डि कॉक

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डि कॉक या स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या यादीत पाचव्या स्थानी असून, त्यानं 229 धावा केल्या आहेत.

रचिन रविंद्र

सर्वाधित धावा करणाऱ्या खेळाडूंच्या या यादीत न्यूझीलंडचा भारतीय वंशाचा खेळाडू रचिन रविंद्रही आहे. सहाव्या स्थानी असणाऱ्या रचिननं या स्पर्धेत 106 च्या स्ट्राईक रेटनं 215 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story