अनुष्काच्या बेबी बम्पचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू वेगळं सांगतेस, विराट वेगळं सांगतोय'

अनुष्काच्या फोटोने वेधलं लक्ष

विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

काही आठवड्यांपूर्वी समोर आल्या बातम्या

अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या बातम्या काही आठवड्यांपूर्वी समोर आल्या होत्या.

दुसऱ्यांचा आई-बाबा होणार अशी चर्चा

अनुष्का आणि विराटला वामिका नावाची मुलगी असून आता हे दोघे दुसऱ्यांचा आई-बाबा होणार असल्याची चर्चा आहे.

गरोदर असल्याचं स्पष्ट होतंय

या चर्चेदरम्यानच अनुष्काने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती गरोदर असल्याचं स्पष्ट होतं आहे.

बेबी बम्प दिसतोय

अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा बेबी बम्प दिसत असून फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अनुष्काचा लूक चर्चेत

अनुष्काने शेअर केलेला फोटो हा एका मोबाईल ब्रॅण्डचं प्रमोशन आहे. मात्र त्या मोबाईलपेक्षा अनुष्काच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

फोटोमागील ट्वीस्ट

हाच तो अनुष्काचा बेबी बम्पचा फोटो. मात्र या फोटोमधील ट्वीस्ट म्हणजे हा फोटो वामिकाच्या जन्माच्या वेळेचा आहे. अनुष्काने 2 फोटो एकत्र करुन पोस्ट केले आहेत.

कॅप्शन चर्चेत

वेळ हा फार पटकन उडून जातो अशी कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिली आहे.

का अडकून रहावं?

तुम्ही वेळेबरोबर अपडेट होऊ शकता तर जुन्या फोनमध्ये का अडकून राहावं असा प्रश्न विचारत अनुष्काने फोनची जाहिरात केली आहे.

तू एक सांगतेस तुझा नवरा वेगळंच सांगतो

ही पोस्ट पाहून चाहत्यांनी नवरा-बायको वेगवेगळ्या गोष्टी सांगत असल्याचं म्हटलंय. 'तू हा फोन घे सांगतेस तुझा नवरा दुसराच फोन घ्यायला सांगतोय' अशा कमेंट्स अनुष्काच्या पोस्टवर केल्यात.

VIEW ALL

Read Next Story