टेस्ट क्रिकेटमध्ये 'या' खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी; विराटचा रेकॉर्ड संकटात

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्‍सनने शानदार शतक झळकावलं.

केन विलियम्‍सनच्‍या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 29 शतके जमा झाली आहेत.

या शतकासह त्याने मायकेल क्लार्क (28) आणि हाशिम आमला (28) यांना मागे टाकलंय.

यावेळी केनने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन (29) आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (29) यांची बरोबरी केली आहे.

केन विलियम्सनच्या या शतकामुळे विराट कोहलीचा रेकॉर्ड धोक्यात असल्याचं मानलं जातंय.

याशिवाय सलग 3 टेस्टमध्ये शतके झळकावणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.

VIEW ALL

Read Next Story