तुम्ही आम्ही भरलेल्या टॅक्समधून देशाच्या आर्थिक कारभार चालतो. आपल्यासारखं क्रिकेटर्सला देखील कर भरावा लागतो.
मागील आर्थिक वर्षात विराट कोहली हा भारतातील सर्वाधिक कर भरणारा खेळाडू ठरला आहे.
विराट कोहलीने मागील आर्थिक वर्षात तब्बल 66 कोटी रुपये कर भरला आहे.
तर माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने मागील आर्थिक वर्षात 38 कोटींचा टॅक्स भरला आहे.
तसेच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरने देखील 28 कोटी रुपयांचं योगदान टॅक्सच्या माध्यमातून दिलंय.
माजी स्टार कॅप्टन सौरव गांगुली याने मागील वर्षी 23 कोटींचा कर भरला आहे.
तर ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याने 13 कोटी रुपये टॅक्स सरकारजमा केला आहे.