भारतातील त्रियुगी नारायण मंदिर येथेच भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह झालेला असं मानलं जातं.
हे मंदिर उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे आहे. या मंदिराला 'अखंड धुनी' मंदिर असंही म्हणतात.
या मंदिरामधील यज्ञकुंडातील धुनी ही मागील तीन युगांपासून तेवत असल्याची मान्यता आहे. त्यावरुनच या मंदिराला 'त्रियुगी' आणि 'अखंड धुनी' ही नावं पडली आहेत.
मंदिरामध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या लग्नासाठी प्रज्वलित करण्यात आलेल्या हवनामधील धुनी आजही तशीच तेवत असल्याचं सांगितलं जातं.
विशेष म्हणजे हे मंदिर शिव आणि पार्वतीच्या लग्नासाठी प्रसिद्ध असलं तरी ते भगवान विष्णूचं देवस्थान आहे.
या मंदिरामध्ये 'ब्रम्ह शीला' नावाने एक जागा आहे. याच ठिकाणी ब्रम्ह देवाने भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न लावून दिलं अशी मान्यता आहे.
हे मंदिर केदारनाथ मंदिराची छोटी प्रतिकृती वाटते. या मंदिराचे शिखराची रचना अगदी केदारनाथ मंदिरासारखी आहे.
भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न झालं तेव्हा ब्रम्हदेवाबरोबरच विष्णू देवही या लग्नाचे साक्षीदार होते असं सांगितलं जातं.
या मंदिरामध्ये तीन कुंड दिसतात. रुद्र कुंड, विष्णू कुंड आणि ब्रम्ह कुंड अशी या कुंडांची नाव आहेत. या कुंडातील पाणी विष्णूच्या नाभीमधून येतं असं मानलं जातं.
आजही दरवर्षी त्रियुगी नारायण मंदिरामध्ये हजारो जोडपी देव ब्राह्मणांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकतात. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन साभार)