केळ्याला सुपरफूड म्हणतात. मात्र, रात्री केळी खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो.
केळीच्या सेवनाने अशक्तपणा दूर होतो. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, पाचनक्रिया सुधारते.
केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. केळीमध्ये 64.3 टक्के पाणी, 1.3 टक्के प्रथिने, 24.7 टक्के कार्बोहायड्रेट असतात.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी आणि मॅग्नेशियम आढळतात, याशिवाय व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-बी6, थायामिन, रिबोफ्लेविन देखील असतात.
सकाळच्या वेळेस केळी खाणे फायदेशीर ठरते. मात्र, रात्रीच्या वेळेस केळी खाणे त्रासदायक ठरु शकते.
आयुर्वेदानुसार रात्री केळी खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
रात्री केळी खाल्ल्याने मेटाबॉलिज्म मंदावते. परिणामी लठ्ठपणाचा धोका निर्माण होऊ शकतो.