कोणी तरी येणार येणार गं...

मॅक्सवेलच्या पत्नीचं डोहाळ जेवण पाहिलंत का?

मागील वर्षी लग्नगाठ

ऑस्ट्रेलिया धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने भारतीय विनी रमणशी लग्न केलं. मागील वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

गुड न्यूज

विनी आणि तिचा पती ग्लेन मॅक्सवेल यांच्या घरी आता गुड न्यूज येणार आहे. त्यामुळे आता कोणी तरी येणार येणार गं... हे गाणं ऑस्ट्रेलियात वाजू लागलंय.

डोहाळे जेवणाचे फोटो

अशातच आज ग्लेन मॅक्सवेलची पत्नी विनी रमणने डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

बेबी मॅक्सवेल

बेबी मॅक्सवेलला पारंपारिक पद्धतीने आशीर्वाद, असं कॅप्शन विनी रमणने दिलं आहे.

निळ्या रंगाची साडी

भारतीय परंपरेनुसार विनी रमणचं डोहाळ जेवण पार पडलं. यामध्ये विनीने निळ्या रंगाची साडी घातली तर मॅक्सवेलने काळ्या फिकट रंगाचा शर्ट घातलाय.

परंपरा विसरली नाही

मेलबर्न शहरात भारतीय तमिळ परंपरेनुसार लग्न सोहळा पार पडला होता. भारताबाहेर असूनही विनी आपली परंपरा विसरली नाही, हे तिनं दाखवून दिलंय.

VIEW ALL

Read Next Story