सावध व्हा!

घरात एकच टॉवेल सगळे वापरतात? थांबा, तुम्ही आजारांच्या कचाट्यात सापडताय

अती घाई संकटात नेई..

तुम्हीही घरात दोघात एक किंवा अशा पद्धतीनं घाईघाईतच दुसऱ्यानं वापरेला टॉवेल वापरता का? लक्षात ठेवा तुम्ही मोठी चूक करत आहात.

निरीक्षण काय सांगतं?

अनेक निरीक्षणं आणि अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार घरातील टॉवेलमध्ये अनेक सूक्ष्म जीवजंतूंचा वावर असू शकतो.

एकच टॉवेल वापरता?

सहसा अनेक घरांमध्ये एकच टॉवेल हातपाय पुसण्यासाठी किंवा तत्सम कारणांसाठी वापरला जातो. बऱ्याचदा दोन दिवस तो स्वच्छही केला जात नाही.

स्वच्छतेला प्राधान्य द्या

टॉवेल स्वच्छ न केल्यास अनेकदा आपण आणि कुटुंबीय स्वत:च आजारपणाच्या दिशेनं पुढे जात असतो.

आजारपणाचा धोका

अस्वच्छ आणि एकच टॉवेल सातत्यानं वापरत राहिल्यास त्यामुळं त्वचाविकार, फूड पॉईझनिंग अशा समस्या होऊ शकतात.

प्रखर सूर्यप्रकाशाचा वापर करा

टॉवेल वापरून झाल्यानंतर तो सर्वप्रथम पूर्णपणे कोरडा करण्यावर भर द्या. शक्य असल्यास टॉवेल प्रखर सुर्यप्रकाशात कोरडा करा.

दुसऱ्यांचा टॉवेल वापरू नका

शक्य असल्यास वापरानंतर टॉवेल धुण्यासाठी टाका. इतरांनी वापरलेला टॉवेल न वापरण्यालाच प्राधान्य द्या.

टॉवेल पूर्ण कोरडा करा

ओलसर टॉवेल चुकूनही वापरू नका. टॉवेल पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच तो घडी घालून खणात ठेवा. या सवयी लहानसहान असल्या तरीही त्याचे परिणाम मात्र हितकारक आहेत हे विसरू नका.

VIEW ALL

Read Next Story