राजकारणातला बुलंद आवाज!

पाहा पंकजा मुंडे यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास

पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस

पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस, महाराष्ट्रातील परळमध्ये 26 जुलै 1979 मध्ये त्यांचा जन्म झाला.

घरातूनच राजकारणाचे धडे

पंकजाताईंचा राजकीय प्रवास लहानपणीच घरातूनच सुरु झाला. वडील गोपीनाथ मुंडे आणि मामा प्रमोद महाजन यांचं राजकारण जवळून त्यांनी पाहिलं.

राजकीय वारस

पुतण्या धनंजय मुंडे यांच्याशी मतभेद झाल्याने गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना राजकीय वारस केलं.

''माझी पंकू माझं नाव काढेल''

मुंडे यांना तीनही मुलं पण मुलगा नसल्याची खंत त्यांना कधीच नव्हती. ''माझी पंकू माझं नाव काढेल'' असं ते म्हणायचे.

एमबीए ते राजकारण

आधी एमबीए, मग डॉ. पालवे यांच्याशी लग्न आणि एका मुलाची आई झाल्यावरही पंकजा यांनी वडिलांच्या इच्छेनुसार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

म्हणून त्या राजकारणात आल्या

खरं त्यांना सुरुवातीला राजकारणात फार रस नव्हता. बोलण्याची शैली आणि लिखाणाची आवड पाहून वडिलांनी राजकारणात यांची इच्छा बोलून दाखवली.

पुण्यात आयटी कंपनी

एमबीएचे शिक्षण घेतलेल्या पंकजा ताईंनी सुरुवातीला पुण्यात एक आयटी कंपनीदेखील सुरु केली होती.

राजकीय प्रवास

भाजप युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यपदाने त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. परळी मतदारसंघाचे त्यांनी 2009 ते 2019 पर्यंत नेतृत्त्व केलं.

पंकजा मुंडे यांचं ट्वीट

पंकजा मुंडे मुलगा आर्यमनसोबत वाढदिवसानिमित्त तिरुपतीला गेल्या आहेत. तर''माझ्या वाढदिवसी मला भेटायला येऊ नका. कारण एकाला वेळ दिला दुसऱ्याला दिला नाही तर तो अन्याय ठरेन. यासाठी आपण जिथे आहात, तिथून शुभेच्छा द्या. त्या माझ्यापर्यंत पोहोचतील, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केला आहे.

VIEW ALL

Read Next Story