भारतीय क्रिकेट संघ सघ्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. कसोटी, एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी मैदानात उतरताच टीम इंडियाच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे .
टीम इंडियाचा हा 200 वा टी20 सामना आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा क्रिकेट जगतातला दुसरा देश आहे.
भारताआधी केवळी पाकिस्तान क्रिकेट संघाने 200 टी20 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने 199 टी20 सामन्यापैंकी तब्बल 127 सामन्यात विय मिळवला आहे.
तर पाकिस्तानच्या नावावर सर्वाधिक 223 टी20 सामन्यांची नोंद असून यापैकी 134 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला टी20 सामना 1 डिसेंबर 2006 मध्ये खेळला होता. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा सामना रंगला होता.
भारताच्या पहिल्या टी20 संघाचं नेतृत्व करण्याचा मान वीरेंद्र सेहवागला जातो. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ 2006 मध्ये पहिला T20 सामना खेळला होता.
अवघ्या एका वर्षात टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये आपला दबदबा केला होता. 2007 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
पहिल्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता.