कडीपत्त्याची पानं पाण्यात उकळून प्यायल्यास होणारे फायदे! यादी पाहून व्हाल थक्क

कडीपत्त्याची पानं पाण्यात उकळून पिण्यासंदर्भात तुम्ही कधी ऐकलंय का? हे आरोग्यासाठी फारचं फायद्याचं असतं, कसं ते पाहूयात...

Swapnil Ghangale
Aug 04,2023

पदार्थाला वेगळीच चव

डाळ असो किंवा भाजी किंवा अन्य पदार्थ कडीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर पदार्थाला वेगळीच चव मिळते.

कडीपत्ता फारच फायद्याचा

मात्र केवळ चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही कडीपत्ता फारच फायद्याचा ठरतो. त्याचबद्दल जाणून घेऊयात...

एवढी पोषक पोषक तत्वं

कडीपत्त्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, कॅल्शिअम, लोह यासारखे पोषक तत्वं असतात.

आरोग्याला फार फायदे

याच गुणधर्मांमुळे कडीपत्त्याची पानं पाण्यात उकळवून प्यायल्यास त्याचा आरोग्याला फार फायदे होतात. हेच फायदे जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

कडीपत्त्याची पानं पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

अ‍ॅण्टी ऑक्सिटंड गुणधर्म

कडीपत्त्यामधील अ‍ॅण्टी ऑक्सिटंड गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती सक्षम होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी फायदा

वजन कमी करायचं असेल तर आहारामध्ये कडीपत्त्याचा समावेश आवर्जून करा. यासाठी उकळत्या पाण्यात कडीपत्ता टाकून नंतर ते पाणी थंड करुन प्यायलं तरी चालतं.

शरीरामधील फॅट्सवर परिणामकारक

कडीपत्त्यामध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर अधिक. त्यामुळे शरीरामधील फॅट्स वाढत नाहीत.

पोट भरल्यासारखं वाटतं

फायबर अधिक प्रमाणात असल्याने कडीपत्त्याची पानं उकलेलं पाणी प्यायल्यास पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अधिक खाणं होत नाही.

साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत

कडीपत्ता किंवा कडीपत्त्याची पानं उकळून प्यायलेल्या पाण्यामुळे शरीरामधील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते.

कडीपत्त्याच्या पानांचा फायदा

त्वचा, डोळे आणि केसांच्या आरोग्यासाठीही कडीपत्त्याची पानं फायद्याची ठरतात.

पचनशक्ती बळकट करण्यासाठी फायदा

पचनशक्ती अधिक बळकट करण्यासाठी कडीपत्ता फायद्याचा ठरतो. कडीपत्त्यामुळे शरीरामधील मेटाबायोलिझमला चालना मिळते.

पचनशक्ती आणि हृदयासाठी फायद्याचं

पचनशक्ती व्यवस्थित असेल तर वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. कडीपत्त्याचं सेवन करणं हे हृदयसाठीही फायद्याचं ठरतं.

सामान्य माहितीवर आधारित

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story