टीम इंडियाचा विकेट किपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक सध्या टीम इंडियापासून दूर आहे. पण यानंतरही तो सतत चर्चेत असतो.

सध्या सोशल मीडियावर दिनेश कार्तिकचा गळ्यात हार घातलेला एक फोटो व्हायरल होतोय.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमुळे दिनेश कार्तिकने तिसरं लग्न केलं का? असं चाहत्यांना प्रश्न पडला. यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्सही केल्यात

वास्तविक दिनेश कार्तिक आणि पत्नी दीपिका पल्लीकलने नवं घर घेतलं असून त्यांना गृहप्रवेश केला. यावेळ दोघांनी गळ्यात हार घातले होते.

व्हायरल होणाऱ्या या फोटोत दिनेश कार्तिक आणि दीपिकाने पारंपारिक पोशाख परिधान केला होता.

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचं 2015 मध्ये लग्न झालं. त्यांना दोन मुलं आहेत. दिनेश कार्तिकचं हे दुसरं लग्न आहे.

दीपिका पल्लीकल भारताची आघाडीची स्क्वॅश खेळाडू आहे. जागतिक क्रमवारी टॉप 10 मध्ये तिचा समावेश आहे

VIEW ALL

Read Next Story