डोंगर दऱ्यांनी नटलेल्या महाराष्ट्रात एक असे ठिकाण आहे जे सर्वात डेंजर पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते.

Jan 25,2024


अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणाऱ्या 400 फूट उंच पाषाण कडा आहेत.


अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातून पुढे दीड ते दोन किमी नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी म्हणजे सांधण व्हॅली.


या दरीतून जाणारी चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही.


आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.


एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे.


पुण्यावरुन आळेफाटा-संगमनेर-अकोले-राजूर-शेंडी(भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. मुंबईतून कल्याण-कसारा घाट-इगतपुरी-घोटी मार्गे तर नाशिकहूनही घोटीमार्गे येथे पोहचता येते.

VIEW ALL

Read Next Story