टीम इंडियातला सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्द शमीला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर बसवलं असलं तरी सध्या तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

तब्बल तीन महिन्यांनंतर मोहम्मद शमीचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. त्याआधी मोहम्मद शमीने आपला लूक बदलण्यासाठी लाखो रुपये खर्च केले.

एशिया कप स्पर्धेपूर्वी मोहम्मद शमीने हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केस प्रत्यारोप शस्त्रक्रिया केलीय. यासाठी त्याने तब्बल चार लाख रुपये खर्च केलेत.

शमीने ज्या क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं त्यावेळचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या क्लिनिकमध्ये एका ग्राफ्टची किंमत नव्वद रुपये आहे. असे त्याने 4505 ग्राफ्ट केले, म्हणजे पूर्ण हेअर ट्रान्सप्लांटसाठी त्याला चार लाख रुपयांचा खर्च आला.

हेअर ट्रान्सप्लान्चबद्दल असलेल्या समज-गैरसमजामुळे सुरुवातील मनात भीती होती, असं शमीने म्हटलं. पण प्रत्यक्ष शस्त्रक्रियेवेळी कोणताही त्रास झाला नसल्याचं त्याने सांगितलं.

जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात शमीने ही शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तीन महिने तो मैदानापासून दूर होता.

VIEW ALL

Read Next Story