टीम इंडियातून बाहेर असलेला श्रेयस अय्यर सध्या रणजी ट्रॉफीत मुंबई संघाकडून खेळतोय. मुंबई आणि विदर्भात अंतिम सामना रंगतोय.
अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी केली. पण त्याचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं. श्रेयस अय्यर 95 धावा करुन बाद झाला.
विदर्भचा वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेने श्रेयस अय्यरला मोठा धक्का दिला. 95 धावांवर खेळणाऱ्या अय्यरला आदित्य ठाकरने अमन मोखाडेकडे झेल देण्यास भाग पाडलं.
श्रेयस अय्यरसाठी हे शतक खूप महत्वाचं होतं, टीम मधून बाहेर असलेल्या अय्यरसाठी बीसीसीआयचं लक्ष वेधून घेण्याची ही चांगली संधी होती.
श्रेयस अय्यरचं शतक हुकलं असलं तरी त्याने आक्रमक खेळी केली. 111 चेंडूत अय्यरने 3 षटकार आणि 10 चौकार लगावले.
बीसीसीआयने नुकतंच श्रेयस अय्यरला कॉन्ट्रॅक्च लिस्टमधून डच्चू दिलाय. श्रेयस अय्यरचा बी ग्रेडमध्ये समावेश होता. बी ग्रेडमध्ये खेळाडूला दरवर्षी 3 कोटी रुपये मिळतात.
श्रेयस अय्यरचं शतक हुकलं असलं तरी सर्फराज खानचा भाऊ मुशीरने शानदार शतक ठोकलं. मुशीरने 136 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार लगावले.