भन्नाट! बाजारात येतीये देशातील पहिली CNG बाईक; मायलेजही जबरदस्त

देशात पारंपारिक इंधन पेट्रोल-डिझेलवरील निर्भरता कमी करण्यासाठी वाहन निर्माता कंपन्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.

आतापर्यंत तुम्ही सीएनजी कार पाहिल्या असतील. पण आता लवकरच देशात सीएनजी बाईक पाहायला मिळू शकते.

बजाज सीएनजी बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. यासह ते कम्यूटर सेगमेंटमध्ये (100cc-110cc) आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असतील.

बजाज ऑटोने नुकतंच 'Trekker' नावाने ट्रेडमार्क नोंदवला आहे. या नावाचा वापर सीएनजी बाईकसाठी केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

याशिवाय कंपनीने जैस मॅराथन आणि ग्लाइडर ही नावंही रजिस्टर केली आहेत. अद्याप तरी कोणत्या नावाचा वापर होईल हे स्पष्ट नाही.

टेस्टिंगदरम्यान ही बाईक दिसली आहे. या मॉडेलनुसार कंपनी एका सलग सीटसह इंधन टाकी देण्याची शक्यता आहे.

कंपनी या बाईकमध्ये 100 किंवा 125 सीसी इंजिनचा वापर करु शकते.

कंपनी ही बाईक पेट्रोलसह सीएनजी अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध करु शकते.

ही बाईक कधी लाँच होणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण सणासुदीच्या काळात ही लाँच होण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story