पाकिस्तान क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर बाबर आझम आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करतोय.

Nov 29,2023


बाबर आझम लक्झरी लाईफ स्टाईल जगतो. त्याला महागड्या कारचा शौक आहे. आता त्याच्या ताफ्यात आणखी एका महागड्या कारचा समावेश झालाय.


या लक्झरी कारची किंमत तब्बल 26 कोटी रुपये इतकी आहे. पण ती पाकिस्तान रुपयात आहे. भारताच या कारची किंमत 7.80 कोटी इतकी आहे.


बाबर आझमने लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे. या कारचा हायस्पीड 350 किलोमीटर प्रतितास इतका आहे.


सध्या बाबर आझम ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीत गुंतला आहे. यासाठी तो जोरदार सरावही करतोय.


बाबर आझम पाकिस्तानी संघाबरोबर रावळपिंडी इथं सराव करतोय. हा सराव कॅम्प ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महत्वपूर्ण मानला जातोय.


एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

VIEW ALL

Read Next Story