आता नो टेंशन

सुट्ट्यांमध्ये परदेशात जायचंय पण व्हिसा नाही? ही शक्कल वापरून तर पाहा...

प्रवास

Travel News : भारतीय पर्यटक सहसा त्यांच्या आयत्या वेळी करण्यात येणाऱ्या बेतांमुळे कायमच लक्ष वेधतात. त्यांच्या याच सवयीमुळं अनेकदा व्हिसाशिवाय प्रवासाची परवानगी दिल्या जाणाऱ्या मलेशिया, थायलंड, श्रीलंका इथं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भटकंती

Thomas Cook India च्या माहितीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अशा पर्यटकांचा आकडा 20 टक्क्यांनी वाढला आहे.

व्हिसा

जिथं व्हिसाची गरज नाही किंवा सोप्या अटींच्या पूर्ततेनंतर जिथं व्हिसा दिला जातो अशा ठिकाणांना भारतीय पर्यटक प्राधान्य देत आहेत. परिणामी थायलंडमधील हॉटेल बुकिंगमध्ये भारतीयांच्या वतीनं 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

झुकतं माप

श्रीलंकेतही भारतीयांना व्हिसाशिवायच प्रवेश दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळं या देशालाही अनेकांचं झुकतं माप.

व्हिसाशिवाय प्रवास

व्हिसाशिवाय प्रवास करता येणाऱ्यांमध्ये मलेशियाचं नावही घ्यावच लागेल. कारण इथंही व्हिसाशिवाय भारतीयांना प्रवास करता येतोय.

परदेशवारीचा बेत

थोडक्यात शेवटच्या क्षणी परदेशवारीचा बेत आखूनही तुम्ही व्हिसाशिवाय परदेशात पोहोचू शकता. यामध्ये तुम्ही मालदीव, म्यानमार, इंडोनेशिया या देशांमध्येही पोहोचताच व्हिसा मिळत असल्यामुळं इथं जाणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे.

VIEW ALL

Read Next Story