बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा लावून आझम खान मैदानात उतरला. आयसीसीच्या नियमांचं त्याने उल्लंघन केल्याने पीसीबी आता त्याच्यावर कारवाईच्या तयारीत आहे.

पीसीबीने आझम खानवर मॅच फिसच्या 50 टक्के आर्थिक दंड ठोठावला आहे. तसंच यापुढे असं न करण्याचा इशाराही त्याला दिला आहे.

नॅशनल टी20 कप स्पर्धेत गेल्या दोन सामन्यात आझम खानने आपल्या बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा चिटकवला होता.

आयसीसीच्या नियमानुसार खेळाडूला आपले कपडे, बॅट, ग्लोव्हज किंवा पॅडवर राजकीय-धार्मिक संदेश देणारे मेसेज लावता येत नाहीत.

आयसीसीचे हे नियम क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांना लागू आहेत. आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा आयसीसीचा सदस्य संघ आहे.

आझम खान पाकिस्तान संघातूनही खेळला आहे. नॅशनल टी20 स्पर्धेत आझम खानने पाच सामन्यात केवळ 7 धावा केल्या आहेत.

आझम खानचं वजन 140 किलो होतं, आता त्याने वजन 30 किलोने कमी केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story