दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षक पदावरुन 'हा' दिग्गज पायउतार


ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉण्टिंग आयपीएलमधल्या दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार झाला आहे. फ्रँचाईजीने ही माहिती दिलीय.


दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट ऑपरेशन डायरेक्टर सौरव गांगुली पॉण्टिंगच्या जागी लवकरच नव्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे.


रिकी पॉन्टिंगला आयपीएलच्या एका हंगामाचे 3.5 कोटी रुपये मिळत होते. त्यामुळे पॉन्टिंगने हा निर्णय काय घेतला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


आयपीएल 2018 च्या हंगामात रिकी पॉन्टिंगची दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएलचे 7 हंगाम त्याने ही जबाबदारी सांभाळली


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आयसीसीच्या पाच ट्रॉफी जिंकणाऱ्या रिकी पॉन्टिंगकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा होत्या. पण दिल्ली कॅपिटल्सला एकदाही आयपीएल ट्ऱॉफी जिंकता आलेली नाही.


रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2000 मध्ये अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण त्यांना पराभव पत्करावा लागला.


रिकी पॉन्टिंगच्या प्रशिक्षक कार्यकाळातल्या सात हंगामात दिल्ली कॅपिटल्सला केवळ तीन वेळा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला आहे.

VIEW ALL

Read Next Story