2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विश्वचषकावर नाव कोरलं. त्यावेळच्या 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमधील अनेक खेळाडूंनी आता राजकारणात प्रवेश केला आहे.

आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने नुकतंच तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पश्चिम बंगालमध्ये बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून तो निवडणूक लढवणार आहे.

युसूफ पठाण 2007 च्या टी20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही सदस्य होता. युसूफ पठाणला थेट अंतम फेरीत संधी देण्यात आली होती. यात त्याने 15 धावा केल्या होत्या.

2011 विश्वचषक विजेत्या संघाचा सलामीवीर गौतम गंभीर 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर दिल्लीतून खासदार झाला. पण यावेळी त्याने राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वेगवान गोलंदाज एस श्रीसंतनेही 2011 विश्वचषक स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं होतं. 2016 मध्ये केरळच्या तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून तो निवडणूक लढला. पण त्याला पराभव पत्करावा लागला.

2011 च्या विश्वचषक विजयातील खेळाडू हरभजन सिंग आम आदमी पक्षातून राज्यसभेचा खासदार आहे. हरभजन सिंगने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं होतं.

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही 26 एप्रिल 2012 पासून 2018 पर्यंत राज्यसभेचा खासदार होता.

VIEW ALL

Read Next Story