उन्हाळा सुरु झाला की अनेकांना त्वचेच्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी क्रीम, फेस वॉश, स्क्रब इत्यादी ब्युटी प्रोडक्टप्रमाणे बर्फही फायदेशीर असतो.

बर्फाचा योग्य वापर केल्यास तुमच्या त्वचेला आश्चर्यकारक फायदे मिळतात.

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर बर्फाचा तुकडा एका रुमालात घेऊन चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे छिद्रांचा आकार कमी होण्यास मदत मिळते.

डार्क सर्कल कमी होतात. तसेच डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत मिळते.

उन्हाळ्यात सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे सनबर्न त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी बर्फाचा वापर करावा.

जर तुम्हाला दीर्घ काळासाठी त्वचेवरील नैसर्गिक चमक हवी असेल तर बर्फाचे काही तुकडे चेहऱ्यावर मसाज करा.

तुमच्या त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होते. तसेच तुमचा चेहरा तजेलदार होतो.

बर्फामुळे फाटलेले ओठ, सूजलेल्या ओठांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

VIEW ALL

Read Next Story