आयपीएल 2025 पूर्वी पार पडणाऱ्या मेगा ऑक्शनसाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे.
नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात.
चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असून त्यांची टीम आतापर्यंत 5 वेळा चॅम्पियन ठरली आहे.
चेन्नई सुपरकिंग्स ऑक्शनपूर्वी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी जेवढी चर्चा सुरु आहे, तेवढीच चर्चा CSK कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याची सुद्धा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार CSK आयपीएल 2025 साठी अजिंक्य रहाणेला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. अजिंक्य रहाणे मागील काही वर्षांपासून CSK साठी खेळतोय परंतू 17 व्या सीजनमध्ये तो फलंदाजीत चांगली कामगिरी दाखवू शकला नाही.
केकेआरकडून खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरला आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये CSK ने विकत घेतले. मात्र शार्दूल समाधानकारक कामगिरी करू शकला नाही तसेच त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याच्या संधी कमी मिळाल्या. त्यामुळे शार्दूल रिटेन होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.
CSK चा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याने आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केले होते. तुषारचा परफॉर्मन्स हा दोन्ही सीजनमध्ये चांगला राहिलाय. परंतु नियमानुसार केवळ 6 खेळाडू रिटेन करण्याची अट असल्याने तुषार देशपांडेचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
मोईन अली हा CSK चा ऑल राउंडर क्रिकेटर आहे. परंतू चेन्नई रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांना रिटेन करू शकते. त्यामुळे नियमांमुळे मोईन अलीला CSK बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
मीडिया रिपोर्ट्स आणि जिओ सिनेमाच्या प्रेडीक्शननुसार चेन्नई सुपरकिंग्स एम एस धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, पथीराना तसेच शिवम दुबे आणि रचिन रवींद्र यांना रिटेन करू शकते.