पाणी पिण्याची सवय शरीरावर सकारात्मक परिणाम करताना दिसते.
पाणी शरीरातील दूषित घटक शरीराबाहेर काढण्यास मदत करतं.
पाणी प्यायल्यामुळं शरीरातील कैक समस्या दूर होतात. ज्यामुळं दर दिवशी पुरेसं पाणी पिणं गरजेचं असतं.
रात्रीच्या वेळी झोपण्याआधी पाणी पिण्याविषयी मात्र मतमतांतरं आहेत.
काहींच्या मते झोपण्याआधी पाणी प्यायल्यामुळं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
तज्ज्ञांच्या मते यात काहीच तथ्य नाही. उलटपक्षी मधुमेह, मायग्रेन आणि हृदयाच्या व्याधी असणाऱ्यांनी रात्रीच्या वेळी जास्त पाणी पिऊ नये. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)