बऱ्याच शीट मास्कमध्ये व्हिटॅमिन सी आणि नियासिनामाइड सारखे घटक असतात. ते त्वचा चमकदार करण्यासाठी आणि त्वचा सुधारण्यासाठी कार्य करतात.
शीट मास्कच्या वापरामुळे तुमच्या त्वचेवर शांत परिणाम होतो. शीट मास्कमध्ये कोरफड, कॅमोमाइल आणि ग्रीन टी सारखे घटक असतात. त्यामुळे त्वचा रिलैक्स् होते.
शीट मास्कमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. ते त्वचेच्या सुरकुत्या आणि बारीक रेषा काढून टाकतात. यामुळे तुमची त्वचा तरुण दिसते.
उन्हातून आल्यानंतरही तुम्ही हा मास्क वापरू शकता. यामुळे त्वचा थंड राहते. सनबर्न झालेल्या त्वचेपासून आराम मिळतो.
शीट मास्कमध्ये जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
शीट मास्कमध्ये सीरम व ग्लिसरीन सारखे हायड्रेटिंग घटक असतात. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
मेकअप करण्यापूर्वी तुम्ही शीट मास्क वापरू शकता. यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेटेड राहते. तुमच्या त्वचेवर बराच वेळ मेकअप राहतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)