एशिया कप स्पर्धेच्या सुपर-फोर सामन्यात भारत आणि बांगलादेशदरम्यान शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यासाठी टीम इंडियात पाच बदल करण्यात आले होते.

टीम इंडियाने एशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यात विराट कोहलीचाहा समावेश आहे.

सामन्यात खेळत नसतानाही विराट मैदानावर दिसला पण वॉटर बॉय म्हणून. संघातील खेळाडूंसाठी विराट मैदानावर चक्क पाणी घेऊन येताना दिसला.

पण तुम्हाला माहित आहे का मैदानावर खेळाडूंना फक्त पाणी देण्यासाठीही विराट कोहलीला लाखो रुपये मिळले आहेत. प्लेईंग इलेव्हनचा हिस्सा नसातानाही त्याला पैसे मिळतात.

एका वनडे सामन्यासाठी टीम इंडियातल्या प्लेईंग इलेव्हनमधल्या खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख रुपये मिळतात.

पण जे खेळाडू प्लेईंग इलेव्हनमध्ये नसतात, पण स्कॉडमध्ये असताता त्यांना सामन्याची अर्धी फिस मिळते. म्हणजे बेंचवर बसणाऱ्या खेळाडूंना एक वन डेच तीन लाख रुपये मिळतात.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली प्लेईंग इलेव्हनमध्ये नव्हता, म्हणून नियमानुसार त्याला या सामन्याचे तीन लाख रुपये मिळतील.

टीम इंडियातील खेळाडूंना एका वनडे सामन्यासाठी 6 लाख, टी-20 सामन्यासाठी 3 लाख आणि एका कसोटी सामन्यासाठी 15 रुपये फि मिळते.

VIEW ALL

Read Next Story