रोहित शर्माचं अर्धशतक

आशिया कपमध्ये पाकिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने 56 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा चौकार आणि 4 षटकार लगावले.

रोहित आणि शुभमनची 121 धावांची भागीदारी

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 121 धावांची भागीदारी केली. दरम्यान या तुफानी खेळीत रोहित शर्माने एक अनोखा रेकॉर्ड केला.

शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या ओव्हरला षटकार

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहीन आफ्रिदीला पहिल्या ओव्हरमध्ये षटकार ठोकला.

जगातील एकमेव फलंदाज

अशी कामगिरी करणारा रोहित पहिला आणि जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

सहाव्या चेंडूवर जबरदस्त षटकार

कोलंबोच्या मैदानात शाहीन आफ्रिदीने पहिली ओव्हर टाकताना पहिल्या 5 चेंडूत एकही धाव दिली नाही. यानंतर सहाव्या चेंडूवर रोहित शर्माने जबरदस्त षटकार लगावला.

पाकिस्तानविरोधातील सहावं अर्धशतक

रोहितचं आशिय कपमध्ये पाकिस्तानविरोधातील हे सहावं अर्धशतक ठरलं. आशिया कपमध्ये एखाद्या संघाविरोधात सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे.

शाहीद आफ्रिदी विकेटसाठी प्रसिद्ध

पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो.

पहिल्या सामन्यात 4 विकेट्स

शाहीनने आशिया कपमध्ये झालेल्या भारताविरोधातील पहिल्या सामन्यात 4 विकेट्स मिळवले होते.

VIEW ALL

Read Next Story