कोपा लिबर्टाडोर्स फूटबॉल स्पर्धेतील एका सामन्यात एक भीषण दुर्घटना घडली. सामन्यात अर्जेंटिनाचा 29 वर्षांचा फुटबॉलर लुसियानो साचेंज याचा धावताना डाव पायच गुडघ्यापासून मोडला

साचेंजही दुखापत इतकी गंभीर आहे की यातून बरं होण्यासाठी त्याला जवळपास एक वर्षाहून अधिका कालावधी लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

लुसियानो साचेंजच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सामन्याच्या 56 व्या मिनिटाला ही दुर्घटना घडली

विरुद्ध संघाचा खेळाडू मार्सेलो लेओनियो हा फूटबॉल घेऊन गोलपोस्टच्या दिशेने धावत असताना लुसियानो साचेंज त्याला अडवण्यासाठी पुढे आला.

मार्सेलोकडून बॉल हिसकावण्याच्या प्रयत्नात साचेंजने डावा पाय पुढे केला. पण दुर्देवाने त्याचा डावा पाय गुडघ्यापासून अक्षरश: मोडला गेला.

त्याचवेळी मार्सेलोचा पाय साचेंजच्या मोडल्या गेलेल्यापायावर पडला, त्यामुळे पाय आणखीनच वाकला गेला. साचेंज जागीच कोसळला

दुर्घटनेनंतर सामना तात्काळ थांबवण्यात आला आणि साचेंजला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं. तिथून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या दुर्घटनेचा धक्का मार्सेलो लेओनियो बसला. मैदानातच मार्सेलोच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. या घटनेवर मार्सेलोने ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story