भारतीय क्रिकेट संघाने वेस्टइंडिजची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली. त्यानंतर एकदिवसीय मालिकाही 2-1 अशी खिशात घातली

आता टीम इंडिया टी20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे

गुरुवार म्हणजे 3 ऑगस्टपासून भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानचा पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे.

टी20 मालिकेसाठी दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे

टीम इंडियात नव्या खेळाडूंचा भरणा आहे. यात शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे ते युवा तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वालवर. हे दोनही खेळाडू आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा, विराट कहोली, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या ज्येष्ठ खेळाडूंना आता टी20 क्रिकेटमध्ये संधी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झालं आहे.

गोलंदाजीतही अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, आवेश खान अशा ताज्या दमाच्या खेळाडूंवर भारताची मदार असणार आहे.

भारत आणि वेस्टइंडिजदरम्यानचा पहिला टी20 सामना 3 ऑगस्टला त्रिनिदाद, त्यानंतर 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्टला पुढचे सामने खेळवले जाणार आहेत.

हर्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, यशस्वी जायसवाल, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार

VIEW ALL

Read Next Story