तुम्ही कधी पाऊस येण्यापूर्वी आभाळ काळं का होतं, याचा विचार केला आहे?
चला, थोडं विज्ञानात डोकावूया. सूर्यप्रकाशात 7 विविध रंगांचा समावेश असतो. त्यात असणारा लाल रंग सर्वप्रथम विस्तारतो आणि शेवटी पसरणारा रंग असतो जांभळा.
हे सर्वकाही अधिक उंचीवर घडत असतं. परिणामी सूर्यकिरणं ढगांच्याही तळाशी पोहोचत नाहीत. ही सूर्यकिरणं न दिसणं म्हणजेच आभाळ किंवा ढग काळे असल्याचं भासणं.
आता शालेय अभ्यासक्रमातील एक संदर्भ लक्षात घ्या जिथं तुम्हाला बाष्पीभवनचा व्याख्या शिकवण्यात आली होती.
पाण्याची वाफ होऊन त्या वाफेचे ढग तयार होतात आणि हीच वाफ ढगांच्या माध्यमातून पावसाच्या थेंबांच्या रुपात बरसते.
ज्यावेळी एखाद्या ठिकाणी काळ्या ढगांची चादर पाहायला मिळते तेव्हा तिथं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन ढगांच्या रुपात हा पाऊसच दडलेला असतो.
पाऊस किती तीव्र होणार हे ढग ठरवतात आणि या ढगांची तीव्रता त्यांच्या उंचीवर आधारलेली असते.
परिणामी जेव्हा वारंवार काळ्या आणि गडद ढगांची चादर तयार होते तेव्हातेव्हा अतिवृष्टी किंवा वादळाची शक्यता वर्तवत हवामान विभाग आपल्याला सतर्क करत असतो.
काय मग, आता कळलं हे ढग काळे का असतात आणि त्यामागचा नेमका अर्थ काय? (सर्व छायाचित्र- फ्रीपिक)