शुभमन गिल नाही तर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन, अंबाती रायडूची मोठी भविष्यवाणी!

अंबाती रायडू

रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.

कर्णधार कोण?

ऋतुराज गायकवाड भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो, असं मत अंबाती रायडूने व्यक्त केलं आहे.

टायमिंग

गायकवाडमध्ये कर्णधारपद असायला हवेत असे सर्व गुण आहेत. तो ज्या पद्धतीने चेंडूला टायमिंग करतो आणि शॉट्स खेळतो त्यामुळे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो, असं रायुडूने म्हटलं आहे.

सुपरस्टार

मला पूर्ण आशा आहे की गायकवाड आगामी काळात भारताचा पुढचा सुपरस्टार बनेल, अशी भविष्यवाणी देखील अंबाती रायडूने केली आहे.

कर्णधार बनण्याची क्षमता

शांतपणे फलंदाजी करणं ही त्याची सर्वात मोठी खासियत आहे. मला वाटतं की त्याच्यात कर्णधार बनण्याची क्षमता देखील आहे, असंही अंबातीने म्हटलं आहे.

चेन्नई सुपर किंग्ज

ऋतुराज गायकवाड येत्या काळात चेन्नई सुपर किंग्जची जबाबदारी सांभाळू शकतो, असं म्हणत रायडूने मोठं वक्तव्य केलंय.

निवृत्ती

दरम्यान, अंबाती रायडू याने मागील आयपीएल हंगामानंतर निवृत्ती घेतली होती.

VIEW ALL

Read Next Story