'ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी...' असं का म्हणाल्यात नीना गुप्ता?

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ती तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते.

नुकताच तिच्या एका विधाने ती चर्चेत आली आहे. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर तिने उघडपणे स्त्रीवादाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

ती म्हणाली की, मी स्त्रीवादीसारख्या निरुपयोगी गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.

स्त्री आणि पुरूष समान नाहीत. तर स्त्रीवादाचा विचार न करता आर्थिकदृष्ट्या मजबूत कसं व्हायचं याचा विचार करायला हवा. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.

ज्या स्त्रिया घर सांभाळत आहेत, त्यांनी स्वत:ला कमी लेखू नये. कारण तुम्ही मोठी भूमिका बजावत आहात. मला एवढंच म्हणायचं आहे की, स्त्री-पुरुष यांची तुलना होऊ शकतं नाही.

ज्या दिवशी पुरुष गरोदर राहायला लागतील, तेव्हा मी म्हणेन की आम्ही समान आहोत.

VIEW ALL

Read Next Story