2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी 7 क्रिकेटर्सच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव 'अकाय' असं ठेवण्यात आलं.
न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर केन विल्यम्सनच्या पत्नीने फेब्रुवारी महिन्यात मुलीला जन्म दिला. ज्यामुळे विल्यम्सन दुसऱ्यांदा बाबा झाला.
भारतीय क्रिकेटर सरफराज खान याच्या पत्नीने 2024 च्या ऑक्टोबर महिन्यात गोंडस मुलाला जन्म दिला.
ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर ट्रेव्हिस हेड हा सुद्धा नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा बाबा झाला. पत्नी जेसिका हिने गोंडस मुलाला जन्म दिला.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा डिसेंबर 2024 रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला. पत्नी रितिका सजदेह हिने मुलाला जन्म दिला ज्याचं नाव 'अहान' असं ठेवण्यात आलं.