माणसांच्या नखांचा आकार त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक सिक्रेट्स सांगतात. एका अहवालानुसार, नखांचा आकारावरुन तुमचा स्वभाव आणि तुमच्या अंगातील कला उलगडतात.
एखाद्या व्यक्तीचे नखे केवळ त्यांच्या आरोग्याबद्दलच नाही तर त्याच्या स्वाभावबद्दल देखील बऱ्याच गोष्टी सांगतात.
द माइंड जनरलच्या अहवालानुसार, जर तुमची नखे लांब आहेत तर तुमच्यात क्रिएटिव्हीटी, इमॅजिनेशन आणि लॉजिक असे गुण असतील. अशी लोक सर्व कामे उत्साहाने करतात आणि आयुष्यातदेखील क्षणाक्षणाचा आनंद घेतात.
गोलाकार किंवा अंडाकृती नखे असलेली व्यक्ती मनमिळावू असतात. त्यांच्यातील सकारात्मक वृत्तीमुळं ते इतरांशी पटकन कनेक्ट होतात. त्यांच्याकडे लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असते.
रुंद नखे असलेली लोक त्यांच्या मेंदूचा अधिक वापर करतात. हे लोक कोणतेही काम विचारपूर्वक करतात. प्रत्येक कामात बुद्धिमत्ता आणि विचारपूर्वक करतात त्यामुळं त्यांना यश मिळते.
हाताची नखे पिवळी असणे अशुभ मानले जाते. अशी नखे असलेली लोक आपले जीवन बहुकेत गरिबीत घालवतात
नखे वाकडी, कोरडी आणि बोटात अडकलेली असतात, अशा लोकांचे आयुष्य बहुतेक दुखात व्यतीत होते. पण तरीही हे लोक धीर सोडत नाहीत आणि व्यस्त राहतात.