What is the diffrence between Turtle and Tortoise: कासवाला इंग्रजीत काय म्हणतात? असं विचारलं असता तुम्ही या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय देता? Turtle की Tortoise?
दोन्हीपैकी एखादा शब्द तुम्ही वापरत असाल तर, तुमचं उत्तर योग्य आहे. पण, टर्टल आणि टॉर्टोइजमध्ये बराच फरक आहे. दिसायला ते एकसारखे असले तरीही त्या दोघांमध्ये बराच फरक आहे हे कायम लक्षात ठेवा.
जीवशास्त्रानुसार टॉर्टॉईज हा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रवर्गातील एक प्रकार. ज्यामध्ये साप, पाल, मगर अशा प्राण्यांचा समावेश आहे. थोडक्यात टॉर्टोइजही त्यांच्यातलाच एक प्रकार. याविषयीचा अभ्यास Herpatology म्हणून ओळखला जातो.
Turtle ला जीवशास्त्रामध्ये Chelon (चिलोन) असंही संबोधलं जातं. हा प्रकार पूर्णपणे पाण्यातच राहतो. आयुर्मानाबबात सांगावं तर, Turtle 20 ते 40 वर्षे जगतात. तर, टॉर्टोइज सहसा 80 ते 150 वर्षे जगतात.
Tortoise ला शास्त्रीय भाषेत Testudo (टेस्टुडो) असं म्हणतात. तो एक Terrestrial आहे अर्थात तो जमिनीवरच वावरतो.
Turtle आणि टॉर्टोइजच्या पाठीवर असणारं आवरण नरम अथवा टणक असतं. त्यांचं हे कवचच अतिशय महत्त्वाचं असतं.
Turtle च्या पाठीवर असणारं आवरण अतिशय पातळ आणि हलकं असून, त्यांना पाण्यात पोहण्यासाठी याची मदत मिळते. तर, टॉर्टोइजचं आवरण मात्र टणक आणि काहीसं घुमटाकार असतं.
Turtle चं आयुष्य पाण्यातच व्यतीत होतं. याउलट टॉर्टोइजचा जीवनकाळ हा भूपृष्ठावर व्यतीत होतो. आयुर्मानाबबात सांगावं तर, Turtle 20 ते 40 वर्षे जगतात. तर, टॉर्टोइज सहसा 80 ते 150 वर्षे जगतात.
Turtle ना पाण्यात पोहता यावं यासाठी फ्लिपरसारखे पसरट पाय असतात. तर, टॉर्टोइजकडे एलिफंटाइन पाय असतात.
Turtle ओमनीवोरस (सर्वभक्षक) असतात. जेलिफिश, शेवाळ आणि जलपर्णी खाण्यावर त्यांचा भर असतो. तर, टॉर्टोइज मात्र शाकाहारी असतात. गवत, पालापाचोळा खाण्यावर त्यांचा भर असतो. (छाया सौजन्य- फ्रिपिक/ सोशल मीडिया)