देशभरात 15 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यादिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हटलं जातं. पण कधी विचार केला आहे का की, मकर संक्रांतीला तिळगुळ का देतात?
मकर संक्रांतीला सूर्यदेव पुत्र शनिच्या मकर राशीत प्रवेश करतो.
शनिदेवाने पिता सूर्यदेवाचे काळ्या तिळाने स्वागत केलं होतं. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाला महत्त्व आहे.
धार्मिक शास्त्रानुसार सूर्यदेव आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळ आणि गूळ दान केलं जातं.
वैज्ञानिक कारण थंडीपासून बचावासाठी गूळ आणि तिळाचं सेवन केलं जातं. गूळ आणि तिळामुळे शरीराला ऊब आणि प्रतिकारशक्ती वाढते.
मकर संक्रांतीला जुनं सोडून नवीन सुरुवात म्हणून एकमेकांप्रती आपलुकी आणि गोडवा वाढवा म्हणून तिळ आणि गुळ दिलं जातं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)