मान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो!

सतत घाम येण्याने किंवा नीट स्वच्छता न केल्यास मान काळी पडते. चेहऱ्याच्या तुलनेने मान काळी दिसते.

पार्लरमध्ये न जाता घरगुती उपायांनीही तुम्ही काळी पडलेली मान स्वच्छ करु शकता.

एका भांड्यात 1 चमचा तुरडी पावडर घेऊन समान मात्रेत १ चमचा गुलाब पाणी घ्या. त्यात 1 ते 2 चमचे लिंबाचा रस टाकून पेस्ट तयार करुन घ्या.

मिश्रण 15 ते 20 मिनिटे मानेवर लावून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने साफ करा. लक्षात घ्या की, यावेळी साबणाचा वापर करु नका

तुरटीच्या पावडरमध्ये तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा रसदेखील टाकू शकता. यामुळं मानेचा काळपटपणा दूर होतो

कोरफड जेल आणि मुलतानी माती टाकून काळपट झालेल्या मानेवर लावल्यास पुन्हा उजळू शकते.

मुलतानी मातीत कोरफड जेल आणि गुलाब पाणी टाकून ते मानेवर लावा. हा पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story