तुम्हाला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय? जर देवी-देवता दिसले तर...

भविष्यातील संकेत

स्वप्नात घडलेली एखादी घटना तुम्हाला तुमच्या येत्या भविष्यातील शुभ किंवा अशूभ संकेत देतात, असं म्हटलं जातं.

शुभ संकेत

जर तुमच्याही स्वप्नात देवी-देवता येत असतील तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत असतो.

भाग्यावर परिणामकारक

तुमचं स्वप्न तुमच्या भाग्यावर परिणामकारक असतात, असं मानलं जातं. त्यामुळे देवी-देवता स्वप्नात दिसल्याने काय परिणाम होतो पाहुया..

श्रीराम

जर तुम्हाला स्वप्नात श्रीराम दिसत असतील तर तुम्हाच्या आयुष्यातील यशाचा मार्ग खुला होऊ शकतो.

माता लक्ष्मी

जर तुम्हाला स्वप्नात माता लक्ष्मी दिसत असेल तर तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.

शिवलिंग

जर तुम्हाला स्वप्नात शिवलिंग किंवा शंकराचं दर्शन होत असेल तर तुमच्या आयुष्यातील दु:खाचा विनाश निश्चित आहे.

माता दुर्गा

तुमच्या स्वप्नात जर शांत माता दुर्गाचं दर्शन होणार असेल तर तुमच्या आयुष्यात शुभ घटना होणार आहे आणि तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल.

रौद्ररुपी माता दुर्गा

मात्र, जर तुम्हाला रौद्ररुपी माता दुर्गेचं स्वप्न पडलं तर तुमच्याकडून काहीतरी मोठी चूक झाली आहे. ज्याला आता लवकर सुधारण्याची गरज आहे.

भगवान विष्णू

स्वप्नात भगवान विष्णूचं दर्शन झालं तर तुमचं भाग्य लवकरच उजळणार आहे आणि यश देखील मिळण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story