Shukra Vakri

वक्री शुक्र करणार धनवर्षाव! 'या' राशींसाठी ठरेल लाभदायक

Jun 28,2023

या गोष्टींचा कारक

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा भौतिक सुख, प्रेम, विलास, संपत्ती, प्रेम-रोमान्सचा कारक आहे.

शुक्राचा प्रभाव

शुक्राच्या राशी परिवर्तनाचा लोकांच्या जीवनातील या सर्व पैलूंवर मोठा प्रभाव पडतो.

कधी होणार शुक्र वक्री?

शुक्र 22 जुलै 2023 ला वक्री स्थिती जाणार आहे. धन, प्रेम आणि रोमान्स देणारा शुक्र कर्क राशीत उलट फिरेल.

कोणाला होणार फायदा?

कर्क राशीतील शुक्राच्या प्रतिगामी गतीचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. तीन राशीच्या लोकांना शुक्र वक्रीमुळे मोठा फायदा होणार आहे.

मेष (Aries)

या लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल. उत्पन्न वाढेल. कोणतीही मौल्यवान वस्तू घेऊ शकता. वाहन किंवा घराचे सुख मिळू शकते. व्यावसायिकांना फायदा होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मिथुन (Gemini)

आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

तूळ (Libra)

या लोकांना खूप फायदा होईल. करिअरमध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. उच्च पदावर, पगारात वाढ होऊ शकते. धन लाभ तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story