Indian Railway

Indian Railway च्या 'या' हेल्पलाईन क्रमांकावर 100 टक्के मदत मिळणार

रेल्वे विभाग मदतीला

तुम्हीही रेल्वेनं प्रवास करणार असाल, एखाद्या ठिकाणी जायचा बेत आखला असेल आणि काही शंका किंवा काहीही अडचणी असतील तर थेट रेल्वे विभागच तुमची मदत करणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी

Indian Railway विभागाकडून आता प्रवाशांच्या सोयीसाठी एक हेल्पलाईन क्रमांक दारी करण्यात आला आहे.

यात नवं काय?

आता तुम्ही म्हणाल यात नवं काय? तर, 139 या एकमेव क्रमांकावर तुमच्या सर्व तक्रारींचं निवारण होणार आहे.

नवी सेवा

यापूर्वी तिकीटासाठी, चौकशीसाठी किंवा तत्सम इतर कारणासाठी वेगवेगळ्या क्रमांकांवर प्रवाशांना संपर्क साधावा लागत होता. पण, आता मात्र हा प्रश्नच उदभवणार नाहीये.

फोन किंवा एसएमएस

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार या क्रमांकावर फोन किंवा एसएमएस करत तुम्ही रेल्वे प्रवासासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता.

देशपातळीवर सेवा

देशपातळीवर सुरु झालेल्या या क्रमांकावर तुम्ही सोयीनुसार भाषाही निवडू शकता. अगदी मराठी भाषेतूनही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे.

संपर्क कधी साधावा?

रेल्वे डब्यात एखादी अनोळखी वस्तू दिसल्यास, नातेवाईकांना प्रवासादरम्यान संपर्क साधता येक नसल्यास, रेल्वेमध्ये अस्वच्छता असल्यास आणि रेल्वे प्रवासादरम्यान मद्यपान- धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींविरोधात तुम्ही 139 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

प्रकृती बिघडल्यास ...

प्रवासादरम्यान सामान गहाळ झाल्यास किंवा विसरल्यास, तुमची किंवा इतर कोणाची प्रकृती बिघडल्यास या क्रमांकावर संपर्क साधत तुम्ही मदत मिळवू शकता.

कोण मदत करणार?

139 या क्रमांकावर संपर्क साधल्यास तुम्हाला रेल्वे पोलीस, आरपीएफ जवाना, डॉक्टर, टीसी अशा गरजेनुसार सर्व व्यक्तींकडून मदत मिळेल.

VIEW ALL

Read Next Story