Shrawan 2023

श्रावणात हिरव्या बांगड्या का घालतात?

Jul 11,2023

कधी सुरु होतोय श्रावण?

18 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा शिवाचा आवडता महिना मानला जातो.

हिरव्या रंगाला महत्त्व

श्रावणात हरव्या रंगाला अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार या दिवसात हिरव्या रंगाशी संबंधित वस्तू जवळ ठेवणे किंवा घालणे शुभ मानले जाते.

या ग्रहाशी संबंध

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिरव्या रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेला आहे. असं म्हणतात की हिरवे रंगाचे काहीही जवळ ठेवल्यास बुध ग्रह प्रसन्न होतो.

निसर्गाचं प्रतिक

श्रावण हे हिरवगार निसर्गाचं प्रतिक आहे. त्यामुळे श्रावणात हिरव्या रंगाला महत्त्व आहे.

भोलेनाथाची पूजा

श्रावणात सौभाग्य आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी भोलेनाथांची पूजा अर्चा केली जाते.

सकारात्मक उर्जा

हिरव्या रंगाचे कपडे किंवा बांगड्या घातल्याने सकारात्मक उर्जा मिळते. काचेच्या बांगड्यांचा आवाजाने नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात.

शुभ मानलं जातं

श्रावण महिन्यात महिलांनी हिरव्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय हिरव्या बांगड्या घालून भोलेनाथाची पूजा करणे अतिशय लाभदायक असतं असं म्हणतात.

हिरवा रंग

हिरवा रंग भोलेनाथाला प्रिय आहे, असं म्हणतात. त्यामुळे हिरवा रंगाचे कपडे, बांगड्या श्रावणात घातल्यास माता पार्वती आणि शंकराचा आशिर्वाद मिळतो.

वैवाहिक जीवनात सुख

अगदी वैवाहिक जीवनात सुख समृद्धीसोबत मुलांच्या भवितव्यासाठी आशीर्वाद मिळतो.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story