'या' अभिनेत्रीने धर्मेंद्र यांना लगावलेली 'थप्पड', नेमकं काय घडलं होतं?

80-90च्या दशकात धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टी गाजवली होती. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांची चांगली मैत्री होती

अभिनेत्री तनुजा यांच्यासोबत धर्मेंद्र यांची चांगली मैत्री होते. मात्र, तुम्हाला हे माहितीये का एकदा तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या कानशीलात लगावली होती.

तनुजा यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. एकदा त्या धर्मेंद्र यांच्यासोबत 'चांद और सूरज' चित्रपटाची शूटिंग करत होत्या. दोघांचीही चांगली ओळख झाली होती.

धर्मेंद्र यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत तनुजा यांची भेट घालून दिली होती. तेव्हा सनी देओल ५ वर्षांचे आणि मुलगी लाली ६ महिन्यांची होती.

एकदिवस धर्मेंद्र यांनी तनुजांसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. धर्मेंद्र यांचं वागणं पाहून तनुजा गोंधळल्या.

तनुजा यांनी म्हटलं की, धर्मेंद्र यांचं वागणं पाहून मी गोंधळले व त्यांना एक थप्पड लगावली आणि म्हटलं की, बेशरम मी तुझ्या पत्नीला ओळखते. तरीही तुझी इतकी हिंमत की तु माझ्यासोबत फ्लर्ट करतोय.

तनुजा यांची ही रिअॅक्शन पाहून धर्मेंद्र ओशाळले. त्यानंतर अभिनेत्याने तनुजा यांना मला राखी बांध असं सांगितलं.

धर्मेंद्र यांनी मला सांगितले की, तनु, मी सॉरी बोलतो पण प्लीज मला तुझा भाऊ मान, असा किस्सा तनुजा यांनी सांगितला आहे.

धर्मेंद्र यांच्या विनंतीनंतर अभिनेत्रीने एक काळा धागा त्यांच्या मनगटावर बांधला होता.

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात दिसणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story