Sawan 2023

16 ऑगस्टच्या आधी करा 'ही' 5 कामं, घरी येणार धनलक्ष्मी

या वर्षी 19 वर्षांनंतर श्रावण आणि अधिक मास यांचा संयोग जुळून आला आहे. येत्या 16 ऑगस्टला अधिक मास संपणार आहे.

अधिक मासात अतिशय शुभ असून या महिन्यात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपाय केल्यास तुम्हाला लाभ होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

घरातील मंदिरात लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या मूर्तींसमोर अखंड दिवा लावा आणि 11 मुलींची पूजा करुन त्यांना खाऊ घाला.

दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरुन भगवान विष्णूचा जलाभिषेक करा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

सकाळी लवकर स्नान करुन तांब्याच्या भांड्यातून तुळशीला पाणी अर्पण करा. त्यानंतर श्रीहरीला तुळशी अर्पण करा.

संध्याकाळी रोज दारावर दिवा लावा. त्यामुळे घरात लक्ष्मी येते, अशी मान्यता आहे.

तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करताना ओम श्री हृीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मीय नम: या मंत्राचा जप करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story