Har Ghar Tiranga: राष्ट्रध्वजाचे 15 ऑगस्टनंतर काय करायचे? ध्वजसंहिता वाचा

15 ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबवला जात आहे.

या मोहिमेअंतर्गंत 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांना घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे.

मात्र, 15 ऑगस्टचा सोहळा संपल्यानंतर तिरंग्याची काळजी कशी घ्यावी तसंच, तिरंग्याचा मान कसा राखला जावा, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. अशावेळी ध्वजसंहिता काय सांगते ते जाणून घ्या.

ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा

ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये.

अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा

मोहिमेची एक आठवण म्हणून नागरिक तिरंगा घरीच जपून ठेवू शकतात व पुढील वर्षी हाच तिरंगा पुन्हा वापरु शकतात

ध्वज फाटला किंवा खराब झाला तर, एकांतात नष्ट करावा

घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.

VIEW ALL

Read Next Story